दुर्गापूजा हा बंगालमधील एक हिंदू सण आहे. या दिवशी दुर्गा देवीची पूजा केली जाते. हा नवरात्राशी संबंधित सण आहे. या व्रताचे विकल्प कालिका पुराणात सांगितले आहेत. बंगाल, बिहार, ओडीसा, आसाम,उत्तर प्रदेश या प्रांतांत दुर्गापूजेचा उत्सव मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु बंगाल प्रांतात त्याचा प्रचार आणि त्याची लोकप्रियता विशेष आहे. बंगालमधील ग्रामीण भागात ही पूजा वसंत ऋतूमधेही केली जाते अशी नोंद मिळते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.