प्रोफेसरः अरे असा काय बघतोयस? तुला आनंद नाही झाला?

अभिजीतः पण मला कशाबद्दल आनंदी व्हायचय?

प्रोफेसरः अरे वेड्या, आपली टाईम मशीन चालु झाली आहे!

अभिजीत(आश्चर्याने)ः काय? कशी? आपण तर किती दिवसांपासून तिला चालु करण्याचा प्रयत्न करतोय पण काही होत नव्हत.

प्रोफेसरः बर मला सांग. ति का चालु होत नव्हती?

अभिजीतः प्रोफेसर, टाईम मशीनला चालवण्यासाठी असीमित ऊर्जा लागेल.

प्रोफेसरः मग मी तेच सांगतोय. ऊर्जेचा बंदोबस्त झाला आहे.

अभिजीतः कसा?

प्रोफेसरः न्युक्लीयर फिजन

अभिजीतः प्रोफेसर, न्युक्लीयर फिजन टेक्नॉलॉजी तर अणूबॉम्ब मध्ये वापरली जाते.

प्रोफेसरः बरोबर. यामूळे फार मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्माण होते आणि म्हणून अणूबॉम्बचा स्फोट महाभयंकर असतो. हे बघ, माझ्या डोक्यात दोन आयडीयाज होते. एक म्हणजे न्युक्लीयर फ्युजन आणि दुसर न्युक्लीयर फिजन. त्यापैकी न्युक्लीयर फ्युजनवर अजुन काम चालु आहे. त्याला इथे वापरण रिस्की ठरल असत. त्यामुळे मी न्युक्लीयर फिजनची निवड केली. आता फक्त गरज होती ती या टेक्नॉलॉजीतून निर्माण होणार्या ऊर्जेला नियंत्रित करण आणि माझ्यासारख्या टॅलेंटेड माणसाला विज्ञानक्षेत्रात कोणतेही काम अवघड नाही. मी ती पावर कंट्रोल केली. झाली आपली टाईम मशीन तयार.

नोटः न्युक्लीयर फ्युजन आणि न्युक्लीयर फिजन या दोन अणूऊर्जाविषयक टेक्नॉलॉजीज आहेत. न्युक्लीयर फ्युजनमध्ये दोन किंवा अधिक अणू एकत्र आल्यावर ऊर्जानिर्मीती होते. यावर  संशोधन चालु असल्याने हे तंत्रज्ञान अजुन वापरात नाही तर न्युक्लीयर फिजनमध्ये एकाच अणुचे दोन किंवा अधिक भाग केले जातात. हे तंत्रज्ञान अणुबॉम्बमध्ये वापरतात. दोन्हींमधूनही प्रचंड ऊर्जा निर्माण होते.

"प्रोफेसर, यु आर जिनीयस." आता आनंदीत होण्याची पाळी अभिजीतची होती. "आपल स्वप्न साकार झाल."

प्रोफेसरः हो अभिजीत, अरे तू तर काहीच वर्षांपूर्वी आला आहेस. पण मी गेल्या २०-२२ वर्षांपासून यात मेहनत करतोय.आता माझी मेहनत फळाला आली. टाईम मशीनचा जनक म्हणून माझ नाव संपूर्ण जगात घेतल जाईल.

"सर, फक्त तुमच नाव?" अभिजीत डोळे बारीक करून म्हणाला.

प्रोफेसरः अ... अरे म्हणजे आपल्या दोघांच नाव. हाहाहा.

अभिजीतः बेटर. बाय द वे सर, तुम्ही टेस्ट केली कि नाही.

प्रोफेसरः नाही अजुन.

अभिजीतः मग पहीले मला टेस्ट करू द्या ना. प्लीज सर.

प्रोफेसरः नाही, नाही. सर्वात आधी आपण एखाद्या निर्जीव वस्तुवर प्रयोग करूया.

अस म्हणून प्रोफेसरांनी बाजुलाच पडलेल एक घड्याळ उचलल. त्यांनी टाईम मशीनचा दरवाजा उघडला. टाईम मशीन पृथ्वीच्या आकाराएवढी गोल होती. आत दोन जण एकावेळी बसतील एवढी खुर्ची होती. त्या खुर्चीच्या बाजुला एक स्क्रीन होती. त्या स्क्रीनवर TIME, LOCATION, RETURNING TIME अस लिहीलेल होत. त्या स्क्रीनच्या खाली बटण आणि त्या बटणांवर १-९ आकडे होते तसेच इंग्रजी अल्फाबेट्सही होते. प्रोफेसरांनी घड्याळ त्या खुर्चीवर ठेवल. आता सकाळचे सात वाजले होते. प्रोफेसरांनी त्या स्क्रीनवर सकाळी ६:३०चा टाईम टाकला. लोकेशन त्याच जंगलातील टाकल आणि रीटर्नींग टाईम १ मिनिट टाकला. जेणेकरून टाईम मशीन एका मिनीटात तिच्या मूळ स्थानी परतेल. प्रोफेसरांनी मशीनचा दरवाजा बंद केला आणि GO चे बटन दाबले. अचानक टाईम मशीनमधून निळा प्रकाश बाहेर पडला भुर्र भुर्र आवाज करत टाईम मशीन फिरायला लागली आणि त्या दोघांच्याही नजरेसमोरून गायब झाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel