मिथ्या तीं अनन्य कोण तीं असती । ऐसें तंव चित्तीं विचारावें ॥१॥

आहे तो विचार आपुलिया पाशीं । कळा बिंबा ऐसी प्रतिबिंब ॥२॥

शुभ शकुन तो शुभ लाभे फळें । वाढलीं तें कळे अनुभवें ॥३॥

तुका म्हणे माझा असेल आठव । जैसा तैसा भाव तुझ्या पायीं ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel