न पुरे आवडी मायबापापाशीं । घडो काय त्यासी केलेंस तें ॥१॥

होईल नेमिलें आपुलिया काळें । आलियाचे बळें अग्र होऊं ॥२॥

जाणविलें तेथें थोडें एका वेळा । सकळही कळा सर्वोत्तमीं ॥३॥

तुका म्हणे निवेदिलें गुह्य गुज । आतां तुज काज सर्व चिंता ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel