पाहसी विठ्ठला काय माझा अंत । झालों शरणागत तुज देवा ॥१॥

करीं अंगीकार राखें पायांपाशीं । झणीं दिसों देसी केंविलवाणें ॥२॥

नाहीं ऐकियली मागें ऐसी मात । जे त्वां शरणागत उपेक्षिले ॥३॥

तुका म्हणे माझा धरीं अभिमान । अससी तूं दानशूर दाता ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel