श्रावण पौर्णिमेच्या दिवशी बहुधा राखी पौर्णिमाही असते. त्यादिवशी बहिणी भावाला राखी बांधतात आणि ओवाळतात. या विधीला रक्षाबंधन म्हणतात. हा मूळ उत्तरी भारतातला सण आता उर्वरित भारतातही पाळला जातो. या दिवसाची आख्यायिका प्रसिद्ध आहे. देव आणि दानव यांच्यातील युद्ध सुरु होते. देवांचा पराभव होणार असे दिसत असताना देवराज इंद्राची पत्नी इंद्राणी हिने आपल्या पतीच्या मनगटाला एक संरक्षक धागा बांधला आणि दुस-या दिवशी देवांचा विजय झाला. त्या दिवसापासून ही प्रथा सुरु झाली असे मानले जाते. मात्र काळाच्या ओघात आता बहिण भावाला राखी बांधते असा संकेत रूढ झाला आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.