श्रीकाशीपुरि क्षेत्ररक्षण करि विघ्नाप्रती संहरी ।
दुष्टा दंडुनि पातकां परिहरि सुष्टासि स्वर्गांतरी ॥
नेवोनि अति सौख्य देउनि तया मुक्तीवरी सुंदरी ।
त्या भैरवचरणांबुजीं मन रमो माझें मिलिंदापरी ॥१॥
भस्मोध्दूलित अंग शोभत सदा रुद्राक्षमाला धरी ।
चौफेरी उधळे गुलाल सगळा पोशाक तो भर्जरी ।
कस्तूरीतिलकासि लावुनि वरी ऊटी बरी केशरी ।
त्या भैरवचरणांबुजीं मन रमो माझें मिलिंदापरी ॥२॥
माथा शोभति पिंगटा बहुजटा सुस्निग्ध त्या चोखटा ।
वेष्टूनी मुकुटाकृती चमकती वीचित्र ज्याच्या सटा ॥
भ्रूपल्लव विकटा विलोकुनि भटा भीती वसे अंतरीं ।
त्या भैरवचरणांबुजीं मन रमो माझें मिलिंदापरी ॥३॥
अतसीचे कुसुमासमा तनुरमा नासापुटें साजिरीं ।
दृष्टी सौख्य करीं वसे अतैबरी आकर्ण नेत्रांतरी ॥
मीशाला अति पीळ नीळ परि जा बिंबोष्ठ गल्लावरी ।
त्या भैवरचरनांबुजीं मन रमो माझें मिलिंदापरी ॥४॥
रत्नाचे बहु हार मौक्तिक गळां हे मात ते ओविली ।
लावोनी पदकासि लोंबति सदा एकावली गोविली ॥
कर्णीं कुंडल सूर्यमंडळ परि त्रैलोक्य तेजें भरी ।
त्या भैरवचरणांबुजीं मन रमो माझें मिलिंदापरी ॥५॥
मृगश्रृंगीकृत पुंगिनादश्रवणें माथा अही डोलवी ।
वेदें जें प्रतिपाद्य आद्य निज तें डमरूकरीं बोलवी ॥
सत्वादि त्रिगुणात्मरूपचि असे त्रीशूळ ज्याचे करीं ।
त्या भैरवचरणांबुजीं मन रमो माझें मिलिंदापरी ॥६॥
ज्याची कीर्ति दिगंतरीं निनदती कंपीत होती अरी ।
शंभूची नगरी अचिंत्य सुगरी आखंड वस्ती करी ।
विज्ञाना विवरी गुणत्रयनुरी ठेवोनि चीदंबरीं ।
त्या भैरवाचरणांबुजीं मन रमो माझें मिलिंदापरी ॥७॥
शोभे ज्ञाननिधीच सर्व अगळा विश्वाहुनी वेगळा ।
तेज्याचा पुतळा सुखाब्धि विमळा आचिंत्य ज्याची लिळा ।
सर्वालाश्रय व्हावया वदविली नीरंजनी वैखरी ।
त्या भैरवचरणांबुजीं मन रमो माझें मिलिंदापरी ॥८॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.