स्वस्वरुपोन्मुबुद्धि वैदेही नेली ।
देहात्मकाभिमानें दशग्रीवें हरिली ॥
सद्विवेकमारुतिनें तच्छुद्वि आणिली ।
तव चरणांबुजि येउनि वार्ता श्रुत केली ॥ १ ॥
जय देव जय देव जय निजबोधा रामा ।
परमार्थे आरती सद्‌भावें आरती परिपूर्णकामा ॥ धृ. ॥
उत्कट साधुनि शिळा सेतु बांधोनि ।
लिंगदेहलंकापुरि विध्वंसोनी ॥
कामक्रोधादिक राक्षस सखया मारीला ॥
वधिला जंबूमाळी भुवनी त्राहटीला ।
आनंदाची गुढी घेउनियां आला ॥ ३ ॥
निजबळें निजशक्ती सोडविली सीता ।
म्हणुनी येणें झाले आयोध्ये रघुनाथा ॥
आनंदे ओसंडे वैराग्य भरता ।
आरती घेउनि आली कौसल्या माता ॥ जय. ॥ ४ ॥
अनुहत वाजिंत्रध्वनि गर्जती अपार ।
अठरा पद्मे वानर करिती भूभु:कार ॥
आयोध्येसी आले दशरथ कुमार ।
नगरी होत आहे आनंद थोर ॥ जय. ॥ ५ ॥
सहज सिंहासनी राजा रघुवीर ।
सोहंभावें तया पूजा उपचार ॥
सहजांची आरती वाद्यांचा गजर ।
माधवदासस्वामी आठव ना विसर ॥ जय. ॥ ६ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel

Books related to रामचंद्राचीं आरती