दीनानाथा दीनबंधु दयाळा ।
पतितोद्धारकब्रीदा भक्तवत्सला ॥
शरण येतो त्याला आनंद वेला ।
परब्रह्मसुख देसी प्रेमला ॥ १ ॥
जय देव जय देव स्वामी समर्था ॥
आरती ओंवाळूं तव चरणीं नाथा ॥ धृ. ॥
तुजवाचुनि कोणी वाहीं आम्हांसी ॥
माता पिता बंधु मित्र तूं होसी ॥
उरौसीचे तीरी सज्जनगिरिवासी ॥
भावें लक्षूं जातां भवपार करिसी ॥ २ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.