शांतिकल्याण सहजानंद आरती , सहजानंद आरती ।
अखंड ओंवाळूं कृष्णा कैवल्यपती ॥ १ ॥
आरत रे माझ्या प्राणवल्लभा, माझ्या प्राणवल्लभा ॥
जिकडे पहावा तिकडे अवघा सद्गुरू ऊभा ॥ धृ. ॥
अलक्ष्यांचें लक्ष्य, तेथें कैचें लक्षण ।
सद्गुरुची आरती न कळे जन ॥ २ ॥
नित्य हरिकथा नित्यानंददिपवाळी ।
नित्य गणेशदास नीरांजन ओंवाळी ॥ ३ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.