जो जो जो जो जो बाळा केवि येवो । उन्मनी निद्रा लागो तुज गीतीं गावो ॥ १ ॥

जाग जागतां निज पाही माझिया तान्हुलीया । निजीं निज निजुनियां सावध रे कान्हया ॥ २ ॥

तुम्हा चवघींची कळवळ झणीं येथें कां करा । निजीं निजला कान्हा परतोनि जावें घरा ॥ ३ ॥

चवघी जणी वोसरल्या तेथें अनुहात गोष्टी । तया नादातें साधून परेपरत्या सृष्टी ॥ ४ ॥

तेथें उन्मनी निद्रा हारपलें चित्त । देह विदेह खुंटलें सगुण गुणातीत ॥ ५ ॥

शब्द निःशब्द आतां बोलावें तें काय । निजीं निजला एका जनार्दन माय ॥ ६ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel