ब्राह्मण स्त्री करंजपुरीं । हो अंबारव्या सुंदरी । प्राक्संस्कारें प्रदोष करी । तिला वरी माधव विप्र ॥१॥

झाली दृढधी गर्भिणी । बोले तत्वज्ञान जनीं । शोभली ती संस्कारानीं । शुभलग्नीं प्रसवली ॥२॥

तो पढें बाळ ओंकार । पिता करी तत्संस्कार । होती सर्व हृष्टतर । अवतार हा म्हणती ॥३॥

करुन नामकर्मा । नाम घेती नृहरिशर्मा । पिता वेंची धन धर्मा । चित्र नर्मा दावी बाळ ॥४॥

न इच्छि शिंशु बोलाया । तया मूक मानूनियां । ते करितीं बहु उपाया । शिशु तयां दावी खुणा ॥५॥

मूकत्वा टाकी तेव्हां । बांधाल मुंजी जेव्हां । असें म्हणूनी करी तेव्हां । बाल लोहाचें सुवर्ण ॥६॥

बोल तयाचा मानून । करिती व्रतबंधन । मातेपाशीं भिक्षा दान । मागे तीन वेद पढे ॥७॥

जैं प्रातःकाल येतां । अंधःकार जाय अस्ता । तेवीं बाळें वेद पढतां । मर्त्यताधी लोपली ॥८॥

सर्वां परम हर्ष झाला । बटू प्रार्थी मातेला । स्वीकारुं संन्यासाला । होती तुला पुत्र पुत्री ॥९॥

माता दंभोलीपातसे । ऐकतांची पडतसे । सांवरोनी बोलतसे । क्रम असे संन्यासासी ॥१०॥

वेदांत ब्रह्मचर्यादि । क्रम असे नच आधीं । अन्यथा पडे मधीं । पुत्र सुधी ऐक म्हणे ॥११॥

इति श्री०प०प०वा०स० नृसिंहावतारो नाम एकादशो०

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel