देवीचा चांगला पुत्र जेव्हा देवीची पूजा करतो. तेव्हा त्याच्याबरोबर देवी देखील आनंदाने आणि उदारतेने परिपूर्ण अशी एक चांगली माता बनते. जशी या चित्रात दिसणारी देवी आहे. ती लक्ष्मी आहे, पृथ्वीच्या समृद्धीचे आणि उदारतेचे रूप आहे. हे रूप स्थानिक नाही. हे सर्वसमावेशक आध्यात्मिक चिंतनाचे प्रतीक आहे.

लक्ष्मी समृद्धी आणि संपत्तीची देवी आहे. श्रीच्या रूपाने ती आपल्या जीवनात समृद्धी आणते, रंकाला राजा बनवते. पृथ्वीच्या रूपात, ती सौम्य पृथ्वी आहे आणि तिच्या सर्व मुलांना घर आणि आश्रय देते.

या चित्रात दिसते कि ती एका कमळाच्या फुलावर बसलेली आहे, जी जीवनाच्या आनंदातून प्राप्त होणाऱ्या सर्व चांगल्या गोष्टींचे प्रतीक आहे. तिच्या पुढे पांढरे हत्ती आहेत जे समृद्धीचे आणि शक्तीचे प्रतीक आहेत आणि ते  फक्त सर्वोत्तम राजांसाठी राखीव आहेत.

तिच्या मागे  खाजगी मालमत्तेचे द्योतक असणारे पात्र आहे, जे नदी किंवा तलावासारखे नाही याउलट सर्व संपत्तीचे स्त्रोत आहे. हे भांडे हे कलेचे पवित्र कार्य आहे, जे एखाद्याच्या मर्यादेत असलेल्या संपत्तीचे प्रतीक आहे. ही निसर्गाची सार्वजनिक संपत्ती नाही. ही अशी संपत्ती आहे ज्यावर एखाद्या मनुष्याने आपला वैय्यक्तिक हक्क प्रस्थापित केला आहे.

लक्ष्मीच्या आजूबाजूला अशा वनस्पती आहेत, ज्या माणसाची भूक शमवतात आणि त्याच्या इंद्रियांना आनंद देतात. नारळ आणि केळीच्या झाडांना जास्त काळजी घ्यावी लागत नाही; परंतु ते सर्वांना पोषण देतात, म्हणून त्यांना पवित्र वनस्पती मानले जाते. त्या वनस्पती सार्वत्रिक आहेत आणि कमीत कमी गुंतवणूकीवर प्रचंड परतावा देतात. भांड्यात ठेवलेली आंब्याची पाने अशा गोड फळांची आठवण करून देतात, ज्या फळांमुळे उन्हाळा सुसह्य होतो. भांड्याच्या तळाशी ठेवलेली सुपारी खाल्ल्यानंतर चघळली जाते. सुपारी पचन शक्ती वाढवते आणि कामोत्तेजक म्हणून देखील कार्य करते. अशा प्रकारे, ही झाडे समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहेत. देवीच्या सार्वत्रिक स्वरूपात तिची कल्पना करून मनुष्याला आनंद आणि समृद्धी यांची अपेक्षा आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel