मुंबईतील अनेक श्रद्धास्थानांपैकी भक्तांनी नेहमी गजबजलेल्या असणारे हे श्री सिद्धिविनायकाचे मंदिर म्हणजे एक प्रसिध्द गणेशस्थान आहे.
या मंदिराचा प्रसिध्दी काळ अगदी अलीकडचाच आहे अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे या स्थानास आशीर्वाद लाभले आहेत
रामकृष्ण जांभेकर महाराज यांनी स्वामी समर्थांच्या आदेशावरुन या स्थानावर सिद्धी पुरल्या होत्या.
पूर्वीची मूळ मूर्ती तशीच ठेवून सहा मजली बहुकोनी जीर्णोद्धारित इमारत त्यावर बांधली गेली आहे.
मधोमध त्यावर कळसही आहे दादर वा परळ येथून बेस्टच्या बऱ्याच सेवा सिद्धीविनायकासाठी उपलब्ध आहेत.
येथे दादर वा परळहून पायीदेखील येता येते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.