इकडे बाहेर उभा असलेला विशाल मोबाईलवर पब्जी खेळत होता आणि इतक्यात त्याच्या बाईकच्या समोर एक ओमनी गाडी येऊन उभी राहिली. विशालचे लक्ष नव्हते. थोड्या वेळात ती रिवर्स घेऊन मागे येऊ लागली. विशालने बाईकचा हॉर्न वाजवला. तेव्हा गाडीतून ड्रायव्हरने डोके बाहेर काढले आणि तो विशालकडे एकटक बघू लागला. तो ड्रायव्हर कपड्यांच्या दुकानातील पुतळ्यासारखा एक पुतळा होता. त्याने विशालकडे बघून त्याला पूर्ण स्कॅन करून घेतले आणि काही क्षणातच त्याने हुबेहूब विशालचे रूप घेतले. आता ओम्नी कार बाईकच्या खूपच जवळ आली होती आणि बाईकला तिचा रेअर बम्पर धडकणार इतक्यात ती अचानक थांबली. विशाल आता वैतागला होता. तो उतरला आणि ओम्नीच्या ड्रायव्हरची कॉलर पकडायची असं ठरवून गाडीजवळ गेला. काही समजायच्या आत ओम्नीचे साईडचे दार उघडले आणि आत बसलेल्या दोन पुतळ्यांनी विशालला आत ओढून घेतले.  नंतर तो विशालचा डुप्लिकेट बाईकवर आला आणि पब्जी खेळत बसला. ओम्नी भरधाव वेगात निघून गेली.       

पूजाने आणखी काही चित्रे आणि कात्रणं पहिली तरी पूजाचा विश्वास बसतच नव्हता कि प्रोफेसरचे वय १०० पेक्षा जास्त असेल कारण तो ३५ किंवा फार-फार तर ४० वर्षाचा माणूस वाटत होता. शेवटी ती निराश होऊन जसबीरच्या दुकानातून बाहेर आली आणि तिने विशालला बाईक काढायला सांगितली. विशालने फोन ठेवला. बाईक सुरु केली आणि ते तिथून निघाले.

मग जाता-जाता रस्त्यात पनवेलच्या ओरीयन मॉलमध्ये ते गेले. पुजाला भूक लागली होती आणि नंतर तिला वरुण धवनचा नवीन रिलीज झालेला सिनेमा पहायचा होता. त्यांनी मॉलच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आणि ते थेट मल्टीप्लेक्समध्ये गेले. आधी त्यांनी दोन तिकिटे घेतली. मग ते समोरच्या फूड कोर्टमध्ये बसले. त्यांनी आज नाचोज आणि टाकोज मागवले होते. काही वेळ दोघे गप्प बसून होते इतक्यात त्याचे फूड रेडी झाले. तरी विशाल उठला नाही. पुजाला काही कळेना. तो जात नाही हे पाहून ती स्वत: गेली आणि तिने फूड-ट्रे आणला. जसा तिने तो फूड-ट्रे खाली ठेवला तसा विशालने कोल्डड्रिंकचा स्ट्रॉ उचलला आणि त्याने तो खायला सुरुवात केली. पुजाला काहीच कळत नव्हते. मग विशालने तिला विचारले,

“प्रोफेसर कुठे आहे, बेबी...?”

“ माहित नाही... मला पण तेच कळत नाहीये.” ती म्हणाली  

“प्रोफेसर कुठे आहे, बेबी...?” त्याने पुन्हा विचारले.

ती त्याच्याकडे पाहत होती. त्याच्या पापण्या लावत नव्हत्या. तो रोखून तिच्याकडे बघत होता. त्याचा आवाज नेहमीपेक्षा वेगळा वाटत होता  आणि तो तिला कधीच बेबी म्हणत नसे. तिला ते आवडायचं नाही.

“प्रोफेसर कुठे आहे, बेबी...?” पुन्हा त्याने तोच प्रश्न विचारला .

इतक्यात फूड कोर्टचा क्लिनिंग स्टाफ तिकडे आला.

“ट्रे घेऊन जाऊ का...?” असे विचारले.

“ नाही... तो मी अजून खाल्ला नाहीये...!” विशाल म्हणाला.

तरी त्याने तो ट्रे उचलला तेव्हा विशालने रागाने वर पहिले आणि तो उठून उभा राहिला. तो स्टाफचा माणूस प्रोफेसरच होता. विशालच्या हाताचा आकार बदलला होता. त्याने हात वर उचलला तेव्हा तो एखाद्या मोठ्या हातोडीसारखा दिसत होता. त्याने प्रोफेसर वर हल्ला केला. प्रोफेसरने चपळाईने क्लीनर स्प्रे त्याच्या तोंडावर मारला. क्लिनर स्प्रे बॉटलमध्ये अँटी-प्लास्टिक लिक्विड होतं. त्यामुळे त्याचे तोंड वितळले आणि वेडेवाकडे झाले. डोळेसुद्धा विचित्र दिसू लागले. तरीही विशाल त्याच्यावर हल्ला करतच होता. प्रोफेसर इकडे तिकडे पळत होता. फूड कोर्टमध्ये आलेले इतर लोक सुद्धा भांबावले होते. थोड्याच वेळात त्याचा वितळलेला चेहरा पूर्ववत झाला. प्रोफेसरने चपळाईने त्याचे डोके आपल्या हाताने जखडून धरले आणि मुळापासून उपटून काढले. हे दृश्य पाहून आजूबाजूच्या लोकांमधली एक बाई जोरात किंचाळली. इतक्यात एका माणसाने फायर अलार्म सुरु केला आणि मॉलचा इमर्जन्सी एक्झिट उघडला. सगळेजण आता फूड कोर्टमधून पळत सुटले. आता डोक नसलेला विशाल फूड कोर्टमधल्या टेबलांची नासधूस करत होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
anahita

Great story.

davross

हे कल्पनेपलिकडचे आहे. लेखकाने सायन्स फिक्शन अगदी वेगळ्याच प‍ातळीवर नेऊन ठेवली आहे. वाचताना अशक्यप्राय वाटतात अशा गोष्टी अक्षरश: डोळ्यासमोर येतात.

Vanamala

छान आहे, सरळ सोपी भाषा ,ओघवती व उत्कंठावर्धक कथा पूजा व प्रोफेसरचा प्ढील प्रवास वाचायलाही आवडेल

dreamy__head

Superbly written story..!! Amazing flow of story.. Would surely love to read more books.. Just fantastic ❤

Rudramudra

Wow... this sci-fi is awsome...! would like to read more books... nice concept..

Akshay Dandekar

simply amazing...... would like to read more part of this book..

हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel

Books related to प्रोफेसर X- प्लास्टिक


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
सापळा
श्यामची आई
झोंबडी पूल
खुनाची वेळ
कथा: निर्णय
रत्नमहाल
लोकभ्रमाच्या दंतकथा
शिवाजी सावंत
पैलतीराच्या गोष्टी
गावांतल्या गजाली