ही कथा आहे दोन शेतकरी मित्रांची. एकमेकांना मदत करणाऱ्या, जीवाला जीव देणाऱ्या दोस्तांची. एकमेकांच्या सुख दु;खात सहभागी होत असताना या दोघांना धर्म कधी आड येत नाही. याउलट त्यांच्या पत्नी ज्या दोघी एकमेकींच्या वाऱ्याला उभे राहण्यास देखील तयार नाही. काशीबाई कष्टाळू आणि रागीट! याउलट फातिमा आळशी आणि मृदू स्वभावाच्या. अनेक वर्षाचे संघर्षमय नाते असलेल्या यांच्या आयुष्याला दुर्दैवाच्या अजगराचा विळखा बसतो. नावडत्या व्यक्तीच्या मुलासाठी हटवादी स्त्रीच्या दगडासारख्या हृदयाला पाझर फुटेल का? याचे हृदयस्पर्शी वर्णन सुधा मूर्ती करतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel