कळ नारदाची खोटी । तीन ताळाच्या तळवटी ।सोन्याची बिघडली भटी । राजअंतरी पडल्या तुटी ।कंस्तुरींत पडली हिंगाची विठी । वडील गंधारी धाकली कुंती ।म्होरं लागलं अस्तनापूर । तिथं कांही कैराव चतुर ।तिथं नांद कैराव चतुर । बंधु एकागळ शंभर । दुष्ट या शंभराची नदर । त्यानीं काय बसून केला विचार ।नाहीं पाहिलं दूरवरी । आतां गेली वोसून गंधारी ।मर्तकीचा बनविला हत्ती । त्याला काय बनवंल सुती ।रंग दिला भवयागती । जशीं काय चित्रं काढली भिंती ।लंबी सोंड त्याला शोभती । गळ्याघाट सर दोहेरी ।आतां गेली वौसून गंधारी । हत्तीवर घातली अंबारी ।अंबारीला खांब सोनेरी । सोन्याच्या टिका चमकती वरी ।गंधारी बसुनी हौद्यांत । वान देती नगरनारीला ।जाती कुंतीच्या वाड्याला । डाव्या पायाच्या अंगठयान ।तिनं दरवाजा कुंकु लाविलं । शेजेच उदनं सवाल देण ।नाहीं दिला तिच्या प्रभु झाला ऊन ।वसा घ्या तीळगुळ । वसा काय पुसुन भातली कळ ।कळ उत्पन्न केली खरी । आतां गेली वौसून ही गंधारी ।कुंती बोल धाव श्रीहरी । आतां गेली वौसुन गंधारीभिवबा बाहेरुनी आला । माता कां तुझा चंद्र कोमेला ।माता भिवबाला बोलती । आग लागो तुझ्या चंद्राला । आतां गेली वौसून गंधारी मला ।भीम म्हणे झाली शिमा । तिच्याबरुन हत्ती आणीन मी दिमा ।भीम गेले  जमुनास्थळीं । तिथं काय जाऊन डगरी ढासळली ।बंद झाली कैराव आळी । वाट मिळेना झाली हरळी ।चिकलाच बनविल गोळं । चिकलाची गोष्ट नाहीं बरी ।आतां गेली वौसुन गंधारी ।सडसुधा बनाचा बनविला । भीम इंगुन वस्ती गेला ।इंद्रजिताला रामराम केला । इंद्र थरथरा कापला ।भीम काहो येणं केलं । हत्तीकारण येण केल ।हत्ती डांबेशीं बांधला । हत्ती दुरुन दाविला ।त्यांनी धरुन आणिला । साज मारीला बगलेला ।हत्ती डोईवरी घॆतला ।मेघ होऊनी वरनं आला ।काचबंदी अंगणामधीं । मातीनं आटा केला ।साजासकट हातीं झेलला ।भीमा म्हणे झाली शिमा । माता कसा ग झेलीलामाता म्हणे भीमायाला । नऊं महिने वागविला । पांच ज्योतीच्या पंचात्रीनं । मातेन भीमाला ओवाळला ।हत्तीवर घातली अंबरी । अंबारीला खांब सोनेरी ।सोन्याच्या कडा वरी ।कुंती बसून हौद्यांत । वाण काय  देती नगरनारीला ।वाण देती नगरनारीला । जाती गांधारीच्या वाड्याला ।डाव्या पायाच्या अंगुठ्यानं । तिनं दरवाजा कुंकू लाविलं ।शेजेचं उसनं सवाई देणं । नाहीं दिला तेच्या प्रभु झाला ऊन ।वसा घ्या तीळगूळ । वसा काय पुसून मातली कळ ।कळ उत्पन्न झाली खरी । आतां गेली वौसून ही गंधारी ।
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel