पावसाचे दिवस. रात्रीची ११ वाजण्याची वेळ झाली होती. । सर्वत्र शांततेचे साम्राज्य पसरले होते. जमिनीवर सुई टाकली असतांसुद्धा तिचा आवाज ऐकू येईल, इतकी शांतता होती. तो २४ जुलई १९४चा दिवस होता. या वेळी पोलिस कॉन्स्टेबल बाबुराव हा आपल्या कामावर निघून नेहमीप्रमाणे आपल्या हद्दीत गस्त घालीत फिरत होता.

त्याच्या हातांत एक चोरकंदील असून त्याचा उपयोग टेहळणी करण्याकरितां तो मधून मधून करीत असे. ___ हळ हळू कानोसा घेत व आपल्या हतांतील चोरकंदीलाच्या साहा. य्याने सभोवतालचे वरवर निरीक्षण करीत तो आपला मार्ग हळू हळू आक्रमीत होता. याप्रमाणे तो चालला असता पुढे थोड्याच अंतरावर असलेल्या एका बंगल्यांत कोणी तरी गात असावे, असा त्याला भास झाला व त्या अनुरोधानें तो पुढे गेला; तो त्याला एका बंगल्याच्या वरच्या मजल्यावरील सर्व दिवे पेटत असून त्या दिवाणखान्यांत कोणी तरी गात आहे, असे आढळून आले. गाणे बाबुरावाच्या चांग लेंच परिचयाचे असून ते म्हणणाऱ्याचा आवाज किनरा, गोड, बारीक, व स्त्रीच्या आवाजाप्रमाणे येत असल्यामुळे कोणी तरी स्त्री ते गाणे म्हणत असावी अशी त्याची खात्री पटली.

"किति कीति सांगू तलाऽग !" बाबुराव आपल्याशीच म्हणाला,

" अहाहा ! हा आवाज तरी किती गोड आहे ?" असे म्हणन ते गाणे ऐकण्याकरितां एखाद्या भ्रमिष्टाप्रमाणे तो तेथेच उभा राहिला व जसजसा तो गाणे ऐकतां ऐकतां त्यांत रममाण होऊ लागला, तसतशी त्याच्या तोंडून त्या गाण्याच्या सुरावर आपोआप शीळ बाहेर पडू लागली.

अशा रीतीने बाबुराव त्या बंगल्यासमोर ते गाणे ऐकत उभा राहिला असतां त्याला त्या बंगल्याच्या दरवाजांतून कोणी तरी बाहेर येत आहे असे आढळून आले. ते पाहतांच त्याला पोचविण्यास कोणी तरी दिवा घेऊन येईल असें बाबुरावाला वाटले होते; परंतु तसें कांहींच न होता तो मनुष्य मुकाटयाने बाहेर पडून, आपल्यामागे अगदी आवाज होऊ न देतां, दरवाजा लावून हळूहळू बागेत शिरला. वरील दिवाण खान्यांत गाणेही अद्यापि चालूच होते. गाणारे माणूस आतां तर जलदच ते गाणे गात होते व त्याच्याबरोबर पेटीही मोठमोठ्याने वाजलेली ऐकू येत होती. बाबुरावाने त्या माणसाकडे पाहिले, तो तो थोडी टंगळमंगळ करीत बागेतच उभा होता असे त्याला आढळून आले.

ह्या त्याच्या कृतीबद्दल बाबुरावाला थोडासा संशय आल्याशिवाय राहिला नाही; परंतु आपल्या संशयाचे निरसन करण्यासाठी त्याला तसे विचार ण्यास बाबुरावाला धैर्य होईना. बाबुराव पुढे चालू लागला. जाता जातां त्यानें “ रत्नमहाल " असें त्या बंगल्याचे नांव वाचले. बाबुरावाने एकदा त्या बंगल्याकडे नजर टाकली व तो पुढे जाऊ लागला. इतक्यांत बंगल्यांतून बाहेर पडलेला तो मनुष्य फाटकाच्या बाहेर पडून बाबु रावाकडे आला.

__ " कसं काय हवालदार ? सर्व ठीक आहे ना ? कुठं कसली गडबड तर नाही ?” त्या नवख्या गृहस्थाने अगदी हलक्या आवाजांत बाबु. रावाला प्रश्न केला.

“ छे ! कसलीच गडबड नाही.” बावुरावाने त्याला लष्करी पद्ध तीचा सलाम करून उत्तर दिले.

“वर, कुणी बाई गात आहेत त्यांचं गाणं ऐकण्याकरता मी जातां जातां सहज इथं उभा राहिलों. त्यांचा आवाज अगदी मधुर आहे नाही, साहेब ?" इतक्या अवधीत ते दोघेही चालत चालत रत्नमहालापासून थोडेसे दूर आले. " ती गात आहे ती माझी बहीण आहे.” उत्तरादाखल तो म्हणाला. " अस्सं का ? त्यांचा आवाज फारच गोड असून ते गाणंही चांगल्यापैकी दिसतं आहे.”

" अर्थात् ! मला हे गाणं फारच आवडतं व तिलाही त्या गाण्याच्या सुराची विशेष अभिरुचि आहे." ते दोघे जरी अशा रीतीने बोलत होते, तरी आपला चेहरा होता होई तो बाबुरावाच्या दृष्टीला पडू न देण्याची खबरदारी तो मनुष्य घेत होता. पुढे काही बोलण्याजोगा विषय नाहींसा पाहून त्या मनु ध्याने खिशांतून दोन सिगारेट्स् काढल्या व त्यांतील एक पुढे करीत म्हटले, " तुम्ही धूम्रपान करीत असालच ? " __ " आपला आभारी आहे मी याबद्दल.” ती सिगारेट घेत बाबुराव म्हणाला. दोघांनीही आपापल्या सिगारेट्स् पेटविल्या व धूम्रपानाला सुरवात केली. दोघांनीही आपापल्या सिगारेट्स् पेटविल्यावर ते हळूहळू पुढे चालू लागले. चालता चालतां म्युनिसिपालिटीचा एखादा दिवा समोर आला की त्यांच्या अंगावर प्रकाश पडे.

बाबुरावाच्या बरोबर असलेला तो मनुष्य आपला चेहरा लपविण्याचा त्या वेळी प्रयत्न करी. तरी पण तेवढयांतही संधि साधून बाबुरावाने त्याचा चेहरा न्याहाळन घेतला. त्याला पिळदार मिशा असून टोकदार व निमुळती लहान दाढी आहे असे बाबुरावाला आढळून आले. थोडा वेळ दोघेही काही बोलले नाहीत. शेवटी ही स्तब्धता बाबु रावाला न आवडून त्याने प्रथम बोलण्यास सुरवात केली. " गाणं आटपलंसं वाटतं.” तें ऐकू येत नाही असे वाटून बाबुराव म्हणाला. " असेल; तें कांहीं फारसं मोठं नाही." त्याला उत्तर मिळाले. " गाण्याला बरेच लोक आले असतील, नव्हे ?"

" छे:, मळींच नाहीं ! तिथं बाहेरून आलेली मंडळी कुणीच नाही.' बाबुरावाबरोबरच्या माणसाने उत्तर दिले, “ केवळ करमणुकीसाठी म्हणूनच माझी बहीण गात आहे.”

"हो, तेंही खरंच.” बाबुराव म्हणाला, “खालच्या मजल्यावर दिवे नव्हते ते माझ्या लक्षातच आलं नाही. पाहुणेमंडळी येणारी असती तर सगळीकडेच दिवे लागले असते !” __ हे वाक्य ऐकतांच तो दुसरा मनुष्य थोडासा दचकला. परंतु ताबड तोब चेहऱ्यावर लटकेच हास्य आणून म्हणाला, “ माझ्या बहिणीनं मी जाण्यापूर्वीच ते दिवे मालवण्यास मला सांगितलं होतं, व त्याप्रमाणं मी दरवाजा उघडण्यापूर्वी ते मालवले." "मग आतां तुम्ही घरी जात असाल ? " बाबुराबाने प्रश्न केला. " होय,” तो म्हणाला, "मला भायखळ्याला जायचं आहे. एखादी व्हिक्टोरिया मिळते. तर पाहिली पाहिजे.''

"इथं तुम्हांला गाडी मिळेलसं मला वाटत नाही. कदाचित् मिळा ल्यास स्टेशनवर मिळेल.”

__ "ते मला माहित आहे.” तो मनुष्य म्हणाला," मी इकडे बहिणीला भेटण्यासाठी नेहमी येत असल्यामुळे या भागाची मला चांगली माहिती आहे. मला वाटतं," तो पुढे म्हणाला," या रस्त्याला कोण कोण लोक राहतात याची तुम्हांला चांगलीच माहिती असेल."

__"इतकी काही नाही.” बाबुरावाने उत्तर दिले, “कालपासून माझी बदली या भागावर झाली आहे." हं! एकुण तुम्ही इकडे अगदीच नवखे आहां तर ?” तो मनष्य थोडा विचार करून म्हणाला,

“ तरी पण थोड्याच दिवसांत येथील बहुतेक रहिवाशांची नावं तुमच्या तोंडपाठ झाल्याखेरीज राहणार नाहीत.” इतक्यांत त्या मनुष्याची सिगारेट विझाल्यामुळे त्याने बाबुरावाजवळ आगपेटी मागितली. त्याने सिगारेटला लावण्यासाठी काडी पेटविल्या वर त्या प्रकाशांत बाबुरावाला त्याचा चेहरा पाहण्याची चांगलीच संधि मिळाली. त्या मनुष्याच्या चेहऱ्यावर थोडी त्रासिकपणाची झांक मारत होती. परंतु चेहेरा मात्र चांगलाच देखणा होता. दोघांनीही पुन्हा सिगारेट्स् ओढण्यास सुरवात केली व पुढे चालू लागणार तोच बाबुराव एकदम दचकून म्हणाला, “ माफ करा साहेब. बोलतां बोलतां मी माझ्या हद्दीबाहेर बराच आलो. यापुढं मला आतां येतां येत नाही.” __ “मलाही आतां एखादी गाडी मिळते की नाहीं तें पाहिलं पाहिजे." असें म्हणून त्याने बाबुरावाच्या हातावर तो नको नको म्हणत अस तांही एक रुपया ठेवला व तो पुढे म्हणाला,"माझं घड्याळ बरोबर आहे की नाही कुणाला ठाउक. आतां साडेअकरा वाजन पांच मिनटं झाली आहेत. अकरा-पंचेचाळीसची पसेंजर मिळेल, नाहीं हवालदार ? "

"बहुतेक मिळेल,” बाबुरावनें उत्तर दिले. . त्या मनुष्याची जाण्याची तयारी पाहून बाबुराव मागे परतणार तोच त्याला रस्त्यावर काही तरी पडल्याचा आवाज ऐकू आला. तो आवाज ऐकतांच बाबुरावाने त्याला काही पडले आहे का असे विचारले; परंतु त्याने आपले सव खिसे एकदा चाचपून नकारार्थी मान हालवीत तो म्हणाला, “जर कांहीं तुम्हांला आढळलंच तर मी आणखी दोन तीन दिवस याच वेळेला इथं येणार आहे तेव्हां ती वस्तु मला द्यालच. या भागांत गस्त घालायची तुमची पाळी आणखी किती दिवस राहील बरं?"

“ फार झालं तर तीनचार दिवसांहून अधिक नाही.” "ठीक आहे; आतां मला वेळ काढता येत नाहीं; नाही तर गाडी चुकायची.” असें म्हणून तो तेथून झपाटयाने निघाला. चालत असतां त्याने एकदोन वेळ मागे परतून पाहिलें,परंतु बाबुरावाचें आतां त्याच्या कडे लक्षच नव्हते. शिवाय त्याच्या हातावर चकचकीत राजमुद्रा पडली. असल्यामुळे त्याचा त्या मनुष्याविषयी चांगला ग्रह झाला होता. “ खरोखरच उदार मनुष्य आहे," बाबुरावाने खिशांतून एक विडी काढून ती पेटवितांना म्हटले. विडी पेटवून झाल्यावर त्याची नजर सहज खाली वळली तों काडीच्या प्रकाशामुळे रस्त्यावर पडलेला कसला तरी पदार्थ चकाकत आहे असे त्याला आढळून आले. कांहीं नाणे असेल या भावनेने त्याने वांकून पाहिले तों ती एक मोठी किल्ली आहे असें त्याला समजून आले.

“ अरेरे ! गरीब बिचारा ! " बाबुराव ती किल्ली उचलीत म्हणाला, “आतां त्याचा स्वतःच्याच घरांत शिरकाव होणं कठीण आहे. मी त्याच्या मागं धांवत गेलों तर-” । परंतु तेवढया अवधीत तो मनुष्य बराच दूर गेला असेल असा विचार करून बाबुरावाने त्याच्या मागोमाग जाण्याचे रहित केलें. त्याला आपल्या जागी वेळीच हजर होणे जरूर होते; नाही तर विना कारण वरिष्ठांच्या रोषाला मात्र पात्र व्हावे लागले असते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ती किल्ली देण्याचा निश्चय करून बाबुराव परत फिरला. परंतु थोडे अंतर मागे टाकलें न टाकलें तोंच त्याला एक कल्पना सुचली.मिळाल्यास आणखी एखादा रुपाया मिळवावा ह्या आशेचा मोह त्याला होऊन रत्नमहालांतील त्या मनुष्याच्या बहिणीकडे ती किल्ली देण्याचा त्याने विचार केला.

बाबुराव आपल्या इष्ट स्थळी येऊन पोहचला त्या वेळी वरच्या मजल्यावर दिवे पेटत होते; परंतु गाणे मात्र बंद झाले होते.जवळ असलेल्या दिव्यावरून घरांतील माणसें जागी असावीत असा बाबुरावानें कयास बांधिला. तत्क्षणीच तो फाटक उघडून बागेत शिरला व बंगल्याच्या मुख्य दरवाजाजवळ येऊन त्याने बेल दाबली. बेलचा आवाज ऐकून स्वतः मालकच दरवाजा उघडा वयास येतील, अशी बाबुरावाची अटकळ होती. परंतु त्याने बराच वेळ बेल दाबली असतांही त्याची चौकशी करण्याकरितां आंतून कोणीही आलें नाहीं ! बाबुरावाने आणखी थोडा वेळ वाट पाहून पुनः एकदा ती बेल दाबून पाहिली. परंतु त्याला या वेळीही पूर्वीप्रमाणे अनुभव आला. आंतील ' इलेक्ट्रिक बेल' वाजलेली त्याला ऐकू आली तरीसुद्धा दार उघडण्यास कोणीही येत नाही, हे पाहून त्याला अत्यन्त आश्चर्य वाटले. आंतल्या मंडळींना, खुद्द बंगल्याच्या मालकाला आल्या-गेल्या माणसाची दरकार नाही हे पाहून तो मनांत त्यांच्यावर बराच चडफ डला.

तोंडांतल्या तोंडांत असमाधानाचे शब्द पुटपुटत त्याने पुन्हा एकदा बेल वाजवून पाहिली. परंतु व्यर्थ ! त्याच्या हाकेला आंतून कोणीच 'ओ' दिली नाही. वर दिवे पेटत असतां व कानठळ्या बसवि णारा तो बेलचा आवाज ऐकूनही दरवाजा उघडण्यास कोणीही येत नाही, हे पाहून बाबुरावाला हा प्रकार तरी काय आहे ते काहीच कळेना. घरच्या यजमानाचे अशा प्रकारचे अगदींच शिथिल आदरातिथ्य पाहून बाबुराबाचें मन थोडेसें संशयग्रस्त झाले व त्याच्या पोलिसी मनाने उचल खाल्ली. दरवाजा बंद असल्यामुळे आंत शिरकाव होणे शक्य नव्हतें व बंगल्यांत शिरकाव झाल्याशिवाय आंतील प्रकार सम. जणे अगदीच अशक्य.

__ स्वतःचा कनिष्ठ दर्जा त्याला वरिष्ठांकडे जाण्यास सुचवी,तर चौकस मन आंत काय आहे याचा निर्णय केल्याशिवाय मागे पाऊल टाकू नको, असे सांगे. शेवटी मनाचाच विजय होऊन येनकेन प्रकारेण आंत शिरण्याचा त्याचा निश्चय झालाच. परंतु मनांत येणे व खरोखरीच आंत जाणे यांत महदंतर होते.

किल्लीशिवाय दरवाजा उघडावा कसा हा विचार बाबुरावाला पडला व नशिबावर हवाला ठेवून आपणाजवळ असलेली किल्ली त्याने त्या दरवाजाला चालवून पाहिली. तो एखादा अद्भुत चमत्कार घडून यावा, तसा तो दरवाजा ती किल्ली आंत फिरतांच एकदम उघडला !

___“ आँ ! हा काय चमत्कार ! ” बाबुरावाच्या तोंडून आश्चर्योद्गार आपोआपच बाहेर पडू लागले, “ या किल्लीनं या बंगल्याचा दरवाजा कसा उघडला ? ही त्याच्या घराची किल्ली--पण कदाचित नसेलही. हं, आतां समजलं. कांहीं तरी आषुक-माषुकाचा प्रकार दिसतो आहे. या घराची मालकीण त्याची पत्नी असून तिची नजर चुकवून तो आपल्या प्रेमपात्राला भेटण्याकरतां गेला असावा व येतांना तिच्या नकळत येतां यावं म्हणूनच ही किल्ली त्याने बरोबर घेतली असावी."

___ आपल्या हातांतील चोरकंदिलाने प्रकाश पाडीत पाडीत बाबुराव संगमरवरी दगडाच्या जिन्यापर्यंत येऊन पोंचला व कोणी वर अस स्यास ताबडतोब खाली यावे असे मोठ्याने ओरडून उत्तरासाठी थोडा वेळ तो वाट पाहत राहिला. परंतु त्याच्या प्रश्नाला कोणीही उत्तर दिले नाही; इतकेच नव्हे तर त्या घरांत कसलाही आवाज त्याला ऐकू आला नाही. जिकडे तिकडे पूर्ण शुकशुकाट होता. बाबुरावाला एखाद्या घड्याळाचें टिकटिकणेसुद्धा ऐकू येईना. सर्वत्र शांत !

__ असा प्रकार पाहन बाबुराव अगदीच घोटाळ्यांत पडला. त्याच्या धडपडणाऱ्या हृदयाच्या आवाजाखेरीज त्याला दुसरा कसलाच आवाज त्या घरांत ऐकू येत नव्हता. आपण एवढ्या मोठ्याने ओरडलों तरी सुद्धा आपणास कोणीच कसे उत्तर देत नाही, याचा त्याला अचंबा वाढू लागला व आता यापुढे काय करावे याचा विचार तो करूं लागला. शेवटी कायद्याने तेथें ढवळाढवळ करण्याखेरीज गत्यंतर नाही असें त्याला कळून चुकतांच वर जाण्याचे त्याने मनांत योजिलें. बाबुराव जिना चढून वर येतांच त्याला दिवाणखान्याच्या दरवा जाच्या फटीतून प्रकाश येत आहे असे आढळून आले. आपण बागेतून पाहिला तो हाच प्रकाश, अशी त्याची खात्री झाली. प्रकाश पाहतांच बाबुरावाला थोडा आशेचा किरण दिसू लागला. तो दरवाजाजवळ गेला व समोर असलेला झालरीचा पडदा दूर सारून त्याने दरवाजा ठोठा . वला. परंतु या वेळी त्याला तोच अनुभव आला. त्याने अनेक वेळां दरवाजा ठोठावून मोठमोठ्याने हाकासुद्धा मारल्या; परंतु त्याला किंचि .तही यश आले नाही. दिवाणखान्यांत एवढा झगझगीत प्रकाश असूनही आपल्या हाकेला प्रत्युत्तर मिळत नाही असे पाहून त्याने इतर कसलाच विचार मनांत न आणतां तो दरवाजा एकदम लोटला.

दर वाजा उघडतांच आंतील दिव्यांच्या प्रकाशाची झिरप बाहेर आल्यामुळे बाबुरावचे डोळे अगदी दिपून गेले. डोळ्यांना तो प्रकाश सहन कर ण्याची शक्ति येतांच बाबुराव दिवाणखान्यांत येऊन तेथें तरी आप णास कोणी आढळेल या आशेनें तो आपल्या सभोवताली पाहूं लागला. परंतु प्रथम त्याला त्या जागेत कोणीच मनुष्यप्राणी न दिसतां आपण मात्र अगदीच विलक्षण अशा एका जागी आहोत असे त्याला समजून आले. त्याला तो दिवाणखाना अगदीच विलक्षण दिसावयास लागला. आंत सफेत रंगाशिवाय दुसरा कुठला रंगच त्याला तेथे दिसेना.

सर्व दिवाणखाना पांढऱ्या रंगाच्या वस्तूंनी सजविलेला होता. भिंतींना सफेत तैलरंग दिलेला, खिडक्या व दरवाजे यांनाही तोच रंग, खिडक्या व दरवाजे यांना लावलेले पडदेही सफेत कापडाचे, दिवाण खान्यांतील सर्व लांकडी सामानही सफेत रंग देऊन वारनिश केलेलें, मेजें, खुर्सा, कोचा, कपाटें सर्वच कांहीं तेथें सफेत रंगाचे होते. हा प्रकार पाहून बाबुराव तर अगदी स्तंभितच झाला ! दिवाणखान्यांतील सर्व दिवे पेटत असूनही तेथे कोणीही त्याला दिसले नाही, म्हणून दुसऱ्या एखाद्या खोलीत कोणी आहे की काय हे पाहण्यासाठी तो इकडे तिकडे फिरून पाहूं लागला;तोंच त्याला बाजाच्या पेटीसमोरील खुर्चीवर एक स्त्री बसलेली असून तिने आपले डोके आपल्या समोरील बाजाच्या पेटीवर टेकलेले आहे असे आढळून आले.

तिला पाहताच बाबुराव तिच्याजवळ गेला. परंतु तिनें कांहीं हालचाल केली नाही असे त्याला दिसून आले. त्याने दोनतीनदा 'बाईसाहेब' अशा हाका मारल्या तरी ती स्तब्धच ! अर्थातच बाबु रावाने तिला जागे करण्याकरितां तिच्या हाताला स्पर्श करतांच तो एकदम दचकून मागें सरला ! त्याला तिचा हात दगडासारखा घट्ट व बर्फासारखा थंडगार लागला. कदाचित् आपली चुकीची समजूत झाली असेल म्हणून त्याने तिला पुन्हा स्पर्श करून आपली खात्री करून घेतली व त्याच वेळी तिच्याकडे थोडे निरखून पाहतांच तिच्या गळ्या खालीं रक्त सुकलेले त्याला दिसलें! " काय, खून !" असे उद्गार आपोआप त्याच्या तोंडून आले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel