रात्रीचा तिसरा प्रहर होता. महाराज आपल्या कार्यालयात अस्वस्थ पणे फेर्या मारत होते. महाराजांनी विशेष मार्गाने संदेश चारी दिशांना पाठवले होते. काही ठिकाणी पक्ष्या कडून तर काही ठिकाणी हेरां कडून. पश्चिमे कडून संदेश परत आला होता. कांडला बंदरातून गुजराती व्यापाऱ्यांची जहाजे जगभर जात असत. कांडला मुघल अमला खाली होते. पण खोल समुद्रांत डच आणि पोर्तुगाली चाच्या कडून ह्या व्यापार्यांना फारच त्रास होत होता. मुघल सल्तनत काही त्यापासून संरक्षण पुरवू शकत नव्हती. महाराजांनी मात्र मोठे नौदल उभारण्याची तयारी आधीपासूनच सुरु केली होती. ह्या व्यापार्यांनी महाराजांना संदेश पाठवला होता. महाराज जर पोर्तुगीज लोकांना गोमंतकातून हाकलून लावतील तर व्यापारी महाराजांना धन म्हणून १ लक्ष मुद्रा देतील. १ लक्ष मुद्रेतून तक्षक सेना भाड्यावर घेणे शक्य होते.

बख्तियार खान वेढा टाकून असल्याने महाराजांना स्वतः बाहेर जाणे शक्य नव्हते पण गुप्त मार्गांनी महाराजांनी दूत सदर करार करण्यासाठी पाठवले होते. करार व्यवस्थित पार पडला आहे ह्याची खात्री जो पर्यंत दूत परत येत नाही तोपर्यंत होणार नव्हती. महाराजांचे सेनापती तसेच प्रमुख सल्लगार कुणालाच महाराजांचा निर्णय पसंद पडला नव्हता. पेंढारी लोक कदीच वचनाला जागत नाहीत नाहीत अशी मराठी समाजात समजूत होती. त्या शिवाय उगाच दक्षिणे कडे जाण्याचे प्रयोजन काय होते हे सुद्धा सेनापतीना समजत नव्हते.

रात्रीचा शेवटचा प्रहर सुरु कि संदेश आला कि करार पार पडला आहे. तक्षक सेना वार्याच्या वेगाने पोर्तुगीज गोमान्ताकाला वळसा टाकून रत्नागिरीच्या दिशेने कूच करत आहे. वाटेत कुठल्याही गावाला त्रास देवू नये अशी ताकीद करारात आधीच टाकली गेली होती पण हे पेंढारी लोक ती पळतील कि नाही ह्यावर महाराजांना स्वतः संशय होता.

सूर्योदयाच्या किरणाबरोबर तुतारीची हाक किल्यावरुन आसमंतात घुमली. धड्डकरून किल्याचे दरवाजे उघडले गेले आणि भगव्या ध्वजाच्या खाली मराठी सेना कोंढाणा किल्यातून बाहेर सरली. बख्तियारचे घोडेस्वार किल्याला वेध टाकून होते, इतके दिवस महाराज आंत बसले होते आणि बाहेर येण्याची काहीही लक्षणे मराठी सैनिकांनी दाखविली नव्हती म्हणून थोडेसे बेसावध होते. पण मराठी सैन्य बाहेर आलेले पाहतांच स्वारांनी आपली बिगुले वाजविली, बख्तियार दूरवर तंबूत न्याहारी करत होता तो तशीच टाकून चिलखत घालून बाहेर आला. एका मागोमाग मराठी घोडेस्वार आणि पायदळ किल्ल्यातून बाहेर आले आणि बख्तियारच्या सैन्याला सामोरे गेले.

साप आणि मुंगुस एकमेकावर झडप घालण्याच्या आधी ज्या प्रकारे एकमेकांच्या शक्तीचा अंदाज घेतात त्या प्रमाणे काही क्षण दोन्ही सैन्ये समोरा समोर थांबली. महाराजांनी आपली तलवार उंचावून शत्रूवर आघात करण्याचा इशारा केला आणि किल्यावर पावसाप्रमाणे बाणांचा वर्षाव शत्रू सैन्यावर झाला. काही स्वरांनी आपली ढाली उचलून आपले रक्षण केले तर काही स्वारांच्या गळ्यात तीर जावून ते खाली पडले, काहींचे घोडे उधळले. प्रत्युत्तर म्हणून शत्रू सैन्याने सुद्धा बाणांनी मराठी सैन्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मराठी स्वरांनी द्विसर्प व्युह रचना केली होती ज्यांत दोन स्वरांच्या फळ्या दोन सर्पा प्रमाणे पुढे सरकतात तर पायदलाची रचना चौरसाकार असते. सैन्य बळाच्या मानाने मराठी सैन्ये थोडे होते पण उच्च स्थानावर असल्याने त्यांना फायदा होता. बख्तियारचे सैन्य हळू हळू मागे सरकत होते पण बखीत्यारला त्याची फिकीर नव्हती, घोडदल सपाट जमिनीवर जास्त प्रभावी असल्याने किल्याच्या पायथ्याशी युद्ध सुरु झाल्यास त्याला फायदा जास्त होता.

पण महाराजांची चाल त्याला समजली नाही, किल्ल्याच्या पायथ्याशी पोचताच बख्तियार ने बिगुल वाजवून आपल्या सैन्याला आणखीन मागे नेले, आपली संपूर्ण ताकत एकवटून एकाच जोरदार वार त्याला करायचा होता, आणि त्या वारांत मराठी सैन्याचा धुव्वा उडेल ह्याची त्याला खात्री होती.

मराठी सैन्याला खाली पोचे पर्यंत बरीच झाल पोचली होती, किल्याच्या पायथ्याशी दोनी सैन्ये समोर समोर पुन्हा एकवटत होती, एक साधे सोपे सरळ युद्ध होणार होते. महाराजांनी आपले घोडा पुढे नेला पुन्हा तलवार उंचावली आणि आता ते सैन्याला पुढे चाल करण्याचा हुकुम देतील असे बख्तियारला वाटले पण तसे काहीच घडले नाही. महाराजांनी तलवार उंचावताच उलट मराठी सैन्याने उलट दिशेत तोंड करून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली, जखमी सैनिक वर किल्याच्या दिशेने पळले.

मराठी सैन्याने शेपूट खाली घातले असे वाटून बख्तियारने आपल्या सैन्याला पाठलाग करण्याचा हुकुम केला, म्लेन्च्च सैनिक पुढे सरकले तर खरे पण जणू काही धरती फाटून नरकातील आग वर यावी त्याप्रमाणे संपूर्ण जमिनीतून आगीचे लोळ हवेत उठले. बाख्तीयारचे अनेक स्वार आणि सैनिक बघता बघता जाळून खाख झाले. जे काही वाचले त्यांनी माघार घेतली आणि जे काही मराठी सैन्याच्या मागे जंगलात घुसले त्यांच्या फक्त किंकाळ्या ऐकू आल्या.

महाराजांनी आपली बुद्धी वापरून आपल्या हेरा करवी  दिव्य द्रव्य आधीच भूमीवर पसरवले होते. महाराजांना युद्ध नकोच होते त्यांना फक्त रत्नागिरीच्या दिशेने कूच करायचे होते.

४ दिवसांची वाटचाल मराठी सैन्याला फारच महागात पडली. सेनापती मल्हार आधीपासूनच ह्या मोहिमेच्या विरोधांत होते पण महाराजांच्या हट्टा पुढे कोणाचेच काही चालत नव्हते. ५०० घोडेस्वार, ८०० पायदळ आणि एकूण ७७ सरदार ह्या मोहिमेत सहभागी होते. नेहमी प्रमाणे सोमनाथवर सेवक मंडळी आणि रसद वाहण्याची जबाबदारी होती. कासीम मागे थांबल्याने सोमनाथचा श्रम परिहार होत नव्हता.

पहिल्याच दिवशी सैनिकांना मरून पडलेले एक अस्वल सापडले, नक्की कसे मेले होते ह्याचा काहीही पत्ता नव्हता पण सैनिकांच्या मते हा एक अपशकून होता. रात्र झाली आणि सारोळा नदी किनारी पहिला पाडाव पडला. सोमनाथ दिवस भर घोड्यावर बसून थकला होता पण तंबू ठोकण्याची जबाबदारी त्याच्यावर होती, शामियाना उभा झाल्या नंतर गूढ पद्धतीने शामियान्याला आग लागली. पाहता पाहता सर्व शामियाना आगीच्या लोळात गायब झाला, सोमनाथचे दोन सेवक त्यात गंभीर जखमी झाले. सोमनाथने स्वतः आगीत घुसून मुख्य नकाशा आणि इतर महत्वाचे समान बाहेर काढले. सेनापती मल्हारनी ह्या घटनेची गंभीर दखल घेत काही सेवकांना बंदी बनवले. सोमनाथच्या मते आग हा अपघात होता आणि सेवकांना बंदी बनवणे म्हणजे विनाकारण आपल्याच सैनिकांत दुही माजवणे होते पण त्याने आपले मत बोलून दाखवले नाही.

महाराज झोपायची तयारी करत होते कि इतक्यांत अब्दुलच्या सैन्याने तोरणा काबीज केल्याची माहिती आली. दुर्ग प्रमुखांनी शरणागती पत्करली होती, आई साहेब आणि हंबीरराव शत्रूच्या तावडीतून निसटले होते पण त्या शिवाय आणखीन काहीही माहिती नव्हती.

"वेळ आम्हाला अनुकूल नाही महाराज, आम्ही पुन्हा तोरणा काबीज करू. युसुफ च्या भावाला जिवंत पकडला तर काही तर तह करता येयील." सेनापतींनी पत्र वाचून महाराजांना आपले मत सांगितले.

"मला बुद्धीबळाच्या पटावरील राजा व्हायचे नाही मल्हारराव, मला संपूर्ण मुलुख जिंकायचा आहे. मी जर आज इथून माघार घेतली तर शत्रू आमच्यावर हसेल, इतिहासांत आमचा उल्लेख एक छोटा मोठा बंडखोर म्हणून येयील. पण मला पुढे जायचे आहे, तक्षक सेना भेटली तर अब्दुल काय युसुफ चे शीर सुद्धा मी मराठी मुलुखाच्या वेशीवर टांगेन. १००० सैनिक घेवून आम्ही कोणताही किल्ला जास्त दिवस ठेवू शकत नाही, मूर्तीभंजक आदिलशहाला अद्दल घडवायची असेल आम्हाला मोठे सैन्य पाहिजे."

"मी मुलुखांतील सर्व सरदाराना पत्रे पाठवली आहेत, कोंढाणा मिळाल्या नंतर आम्हाला मुलुखांत जास्त पाठबळ मिळेल. " मल्हार सांगत होते.

"किती सेनापती? ५०० जास्त सैनिक ? ते सुद्धा अर्धवट प्रशिक्षित ? सुरतेहून व्यापारी सांगत होते कि पोर्तुगाली दर्यावर्दी जग पालथे घालत आहेत, त्यांनी नवीन हत्यारे बनवली आहेत, त्यांच्या गलबतांवर इतक्या मोठ्या तोफा आहेत ह्या आमच्या गालाबताना सहज रसातळाला पोचवतात, त्यांच्या बंदुका आमच्या पेक्षां जास्त चांगला नेम धरतात. तक्षक सैन्याकडे प्रशिक्षित सैनिक आहेत, सर्वांत चांगली हत्यारे आहेत."

"पण त्यांच्या कडे स्वामीभक्ती नाही" मल्हार नि महाराजांना मध्येच रोखले.

महाराजांनी स्तब्ध पणे मल्हाररावां कडे टोकून पहिले. "होय, ठावूक आहे मला. तुमच्या कडे स्वामी भक्ती आहे मल्हारराव आणि म्हणूनच पुढे चाल करायचा हुकुम मी तुम्हाला केला आहे."

"मी काही चुकीचे बोललो असेल तर मला क्षमा करा महाराज, मनातील गोष्ट नेहमी राजाला बोलून दाखवावी असेच आमचे शास्त्र सांगते." मल्हार रावांनी वाकून महराजाकडे क्षमा याचना केली.

"राजा आणि सेनापतीत काय फरक असतो ठावूक आहे सेनापती ? तुम्ही युद्ध जिंकण्याचा प्रयत्न करता पण राजाची जबाबदारी युद्धे निवडण्याची असते. काही युद्धांना पर्याय नसतो, हार जरी नक्की असली, जिंकण्याची शक्यता जरी कमी असली तरी ते युध्द लढावेच लागते. काही दिवसांत आम्ही शत्रूला भिडू कडची आम्ही सर्वजण मारले सुद्धा जावू, पण लक्षांत ठेवा जबाबदारी माझ्यावर राहील, विश्वस ठेवा हे युद्ध महत्वाचे आहे. " महाराजांनी मल्हाररावाना सांगितले.

मल्हार रावांनी काहीही प्रत्युत्तर दिले नाही आणि महाराजांचा निरोप घेतला.

दुसर्या दिवशी महाराज खंडोजी काही तरी निरोप पाठवतील म्हणून आतुरतेने वाट पाहत होते पण वाटचाल सुरु होवून मध्यान्ह उलटली तरी कुठूनही कसलाही संदेश आला नाही. जे टेहाळणी स्वार आधी पुढे गेले होते त्यांही आणखीन दुखद खबर आणली. युसुफ ची सेना आधीच रत्नागिरीला पोचणार होती. तक्षकसेना आणि मराठी सेनेला बरोबर गोळा होवून युसुफ़्चा सामना करणे मुश्किल होते. रत्नागिरीला वळसा घालून कदाचित गोळा होणे शक्य होते पण ती वाट जास्त खडतर होती.

वाटेत महाराजांना काही गावे लागली अनेक गावें ओसाड पडली होती, ग्रामदेवतेची मंदिर पाडण्यात आली होती. काहीच्या मते दक्षिणेत महामारी पसरली होती तर काही गावांना अब्दुलने आपल्या वाटचालीच्या दरम्यान उजाडले होते. महाबळेश्वर मधून महाराजांना जायचे होते पण तेथील मराठी सरदाराने महाराजांना पुढे जायला मज्जाव केला म्हणून मराठी सैन्याला कोयना-तपोलिच्या जंगलातून जाणे भाग पडले.

ह्या जंगलात जायला मोठे मोठे शिकारी सुद्धा घाबरत असत. जंगलांत एक शिवमंदिर आहे अशी माहिती मल्हाररवाना होती. कुणीही मंदिर पहिले नव्हते तरी काही नकाशावर त्याची नोंद होती. सूर्यास्त झाल्यावर सुद्धा वाटचाल सुरूच ठेवण्याचा आदेश सेनापतींनी दिला. पायी येणार्या सैन्याला मागे राहण्याची परवानगी दिली पण घोडेस्वार मात्र आंत जंगलात गेले. रात्री ११ वाजता शेवटी ते भग्न शिव मंदिर सापडले. शिवलिंग चांगल्यास्थितीत पण अंत वाघाने कुणालातरी मारून रक्ताचा सडा पाडला होता. काही सरदारांच्या मते हा आणखिन एक अपशकून होता. पण मल्हार राव असल्या गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हते आणि सोमनाथने तत्काळ मंदिर साफ करण्याचे काम हाती घेतले.

रात्री सैनिकांत अफवा पसरली कि महाराज काही तरी तांत्रिक शक्ती प्राप्त करण्यासाठी हि मोहीम चालवत आहेत. मल्हाररावांच्या कानावर हि माहिती गेली तेव्हा त्यांना विशेष संताप झाला. सैनिकांनी असल्या भाकड कथांवर विश्वास ठेवला तर युद्धे जिंकणे मुश्किल जाते हे त्यांना ठावूक होते पण महाराज नक्की रत्नागिरीत कशा साठी जात आहेत हे त्यांना समजत नव्हते.

त्यांनी पुधाकर घेवून सर्व सैनिकांची रचना बदलली काहीना शिकारी साठी तर काहीना पहाऱ्या साठी पसरविले. त्या शिवाय शत्रू रात्री हल्ला करू शकतो अशी बातमी सुद्धा पसरवली. मल्हार रावांनी रात्री बिशान्यावर अंग पसरवले पण झोप मात्र त्यांना दगा देत होती. उद्या आणखीन काय अपशकुन होयील ह्या विचाराने त्यांचे मन आणखीन विचलित होत होते. शकुन अप्शाकुनावर त्यांना विश्वास नव्हता पण आपले सैनिक कदाचित लढण्यासाठी उत्सुक असणार नाहीत हे त्यांना पसंद नव्हते.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel