मजला कधीच मित्रा खड्ड्यात घातले तू ,
आणि भले बुरे ते बोलून घेतले तू ||

अवचीत भेटता तू ,  हसलास ओळखीचे ,
मन मोहरून जाता कोड्यात पाहिले तू ।।

चाळीत राहणारे दुःखात धीर देती ,
अन्  मित्र म्हणवणारा प्रेमात टाळले तू ||

आत्म्यास मोह नसतो इच्छात वासनेच्या ,
जवळ नसून सुद्धा देहास चाळले तू ||

रात्री जरी प्रियेला छेडून स्वप्न जाते,
प्रेमातल्या क्षणांना  `सागर` वाटले तू||

प्रकाश रामचंद्र क्षीरसागर
अर्नेस्टिना, थोरले भाट, ताळगाव, गोवा

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel

Books related to आरंभ: डिसेंबर २०१९


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
श्यामची आई
खुनाची वेळ
लोकभ्रमाच्या दंतकथा
मृत्यूच्या घट्ट मिठीत
पैलतीराच्या गोष्टी
मराठेशाही का बुडाली ?
कथा: निर्णय
९६ कुळी मराठा