गेला तरी सुखें जावो नरकासी । कळकीया विशीं सीवों नये ॥१॥

रजस्वला करी वेलासी आघात । अंतरें तों हित दुरी बरें ॥२॥

उगीच कां आलीं नासवावीं फळें । विटाळ विटाळें कालवुनी ॥३॥

तुका म्हणे लोणी घालुनी शेणांत । उपेगाची मात काय तेथें ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel