धन्य पुंडलिक भक्त निवडला । अक्षयीं राहिला चंद्रभागीं ॥ १ ॥

भक्त नामदेव अक्षयीं जडला । पायरी तो झाला महाद्वारीं ॥ २ ॥

ज्ञानोबा सोपान निघती हे भक्त । अक्षयीं राहत परब्रह्मीं ॥ ३ ॥

बोधरज भला वचनीं गोविला । कीर्तनीं राहिला पांडुरंग ॥ ४ ॥

साधुसंत फार येती थोर थोर । उभा निरंतर चोखामेळा ॥ ५ ॥

संत साधुजन वंदिती चरण । नरहरी निशिदिन सेवेलागी ॥ ६ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel