१९२६ मध्ये इंग्लंडला भरलेल्या 'आंतरराष्ट्रीय तत्वज्ञान परिषदे' साठी त्यांची भारताचे प्रतिनिधी म्हणून निवड झाली हती. पुढे अनेक देशात त्यांनी हिंदूंचे धर्मतत्वज्ञान प्रभावीपणे मांडले. नंतर ते जग प्रसिद्ध तत्वज्ञानी म्हणून मान्यता पावले.
ऑक्सर्फर्ड विद्यापीठाने त्यांना खास आमंत्रण देवून धर्म, नीतिशास्त्र आणि तत्वज्ञान या विषयांवरील व्याख्यानांसाठी बोलविले होते. डॉ.राधाकृष्णन यांनी आंध्र विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठ यांचे कुलगुरू पद भूषविले. नंतर १९३१ ते १९३९ हि वर्षे त्यांनी राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधित्व केले.
1931 साली इंग्लॅडने डॉ. राधाकृष्णन यांना सर ही मानाची पदवी बहाल केली.
पाश्चात्त्य जगताला भारतीय चिद्वादाचा तात्त्विक परिचय करून देणारा भारतावरच्या ब्रिटिश सत्ताकाळातला महत्त्वाचा विचारवंत म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते. भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले. त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांच्या नावाने 'राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट' हा पुरस्कार ठेवला आहे.