श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण नागपंचमी हा आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. हा सण फार जुन्या काळापासून पाळला जात असावा. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेव्हांपासून नागपूजा प्रचारात आली असे म्हणतात.