न तद्‌गृहं जहाति श्री: यत्र अयं पठयते स्वव: ।
क्षय-कुष्ठ-प्रमेह-अर्श:-भगन्दर-विषूचिका ॥१८५॥
गुल्मं प्लीहानम्‌ अश्मानम्‌ अतिसारं महोदरम्‌ ।
कासं श्वासम्‌ उदावर्तं शूलं शोफादिसम्भवम्‌ ॥१८६॥
शिरोरोगं वमिं हिक्कां गण्डमालाम्‌ अरोचकम्‌ ।
वात-पित्त-कफ-द्वन्द्व त्रिदोष-जनित-ज्वरम्‌ ॥१८७॥
आगन्तुं विषमं शीतम्‌ उष्णं च एकाहिक आदिकम्‌ ।
इत्यादि उक्तम्‌ अनुक्तं वा रोगं दोषादिसम्भवम्‌ ॥१८८॥
सर्वं प्रशमयति आशु स्तोत्रस्य अस्य सकृत्‌ जप: ।
सकृत्‌पाठेन संसिद्ध: स्त्रीशूद्रपतितै: अपि ॥१८९॥
सहस्रनाममन्त्र: अयं जपितव्ह: शुभाप्तये ।
ज्या घरात या स्तोत्राचे पठण होते ते घर लक्ष्मी कधीच सोडत नाही. तसेच क्षय-कुष्ठ-प्रमेह, मूळव्याध (अर्श)-भगंदर-पटकी-गुल्म, प्लीहा-खडा-अतिसार-उदरवृद्धी-खोकला-दमा-उदावर्त (आतडयाचा रोग, मल-मूत्र-अवरोध)-शूल-टयूमर (शोफ) इत्यादिकांची उत्पत्ती-शिरोरोग-वमन-उचकी-गण्डमाला-अरुची-वात-पित्त-कफजनित द्वन्द्व (शीतज्वर, रक्तषित इ.) त्रिदोषजनित ज्वर, आगन्तुक ज्वर, विषमज्वर, शीतज्वर, उष्णज्वर एक दिवसीय आदि ज्वर येथे कथित अथवा अकथित दोषादिसंभवरोग या सर्वांचे या सहस्रनामस्तोत्राचा एक वेळ जप केला असता शीघ्र शमन होते, तसेच स्त्री, शुद्र आणि पतितांनीसुद्धा शुभ प्राप्तीसाठी या स्तोत्राचा जप करावा. ॥१८५-१८९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel