त्रिपुरासुर वधु जातां शिव तुजला चिती।
बळिबंधन कराया वामन करि विनंती॥
धाता सृष्टि सृजितां न चले मंदमती।
स्मरण करितां तुझे मग झाली स्फ़ूर्ती॥१॥
जय देव जय देव जयजी गणराया।
हरिहरब्रह्मादिक ते वंदिती तव पाया॥धृ.॥
धरणी धरित मस्तक शेषाला ओझें।
जाहालें तेव्हां स्मरण करि पै तुझे॥
हळुवट पुष्पप्राय घेले गणराजें॥
सुकीर्तीमहिमा घोषे भुवनप्रय गाजे॥ जय.॥२॥
महिषासुरासि वधिता पार्वतिही समरी।
विजया देही म्हणुनी प्रार्थी गौरी॥
गाती मुनिजन योगी सिद्धादिक सौरी।
तुझिया वरदे जिंकिती मन्मथ नरनारी॥जय॥३॥
पंडीत रामात्मज हा कवि किंकर तुझा।
विनवी तुजला भावें पावें निजकाजा॥
ऋद्धीसिद्धीदाता तो स्वामी माझा।
संकट हरुनि रक्षी भक्तांची लज्जा॥जय.॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel