तुह्मी संत मायबाप कृपावंत ।
काय मी पतित कीर्ति वानूं ॥१॥

अवतार तुह्मां धराया कारणें ।
उद्धराया जन जड जीव ॥२॥

वाढावया सुख भक्ति-भाव धर्म ।
कुळाचार नाम विठोबांचे ॥३॥

तुका ह्मणे गुण चंदनाचे अंगीं ।
तैसे तुह्मी जगीं संतजन ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel