अलिप्त संसारी हरिनामपाठें । जाईजे वैकुंठे मुक्तलग ॥ १ ॥
हरिविण मुक्त न करि हो सर्वदां । संसारआपदा भाव तोडी ॥ २ ॥
आशेच्या निराशीं अचेतना मारी । चेतविला हरि आप आपरूपें ॥ ३ ॥
मुक्ताई जीवन्मुक्तची सर्वदां । अभिन्नव भेदा भेदियेलें ॥ ४ ॥
N/A आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.