जय जय सतचितस्वरूपा स्वामी गणराया |
अवतरलासी भूवर जड़ -मूढ ताराया ||
जयदेव जयदेव || धृ.||
निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी |
तें तूं तत्त्व खरोखर नि:संशय अससी |
लीलामात्रे धरिले मानवदेहासी || १ ||
होऊ न देशी त्याची जाणिव तू कवणा |
करुनि 'गणि गण गणात बोते' या भजना |
धाता नरहरि गुरुवार तूची सुखसदना |
जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नयना || २ ||
लीला अनंत केल्या बंकटसदनास |
पेटविले त्या अग्नीवाचुनि चिलमेस |
क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस |
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश || ३ ||
व्याधी धारून केले कैकां संपन्न |
करवियले भक्तालागी विट्ठलदर्शन |
भवसिंधु हां तरण्या नौका तव चरण |
स्वामी दासगणूचे मान्य करा वचन || ४ ||
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.