जय अंबे जगदंबे जय जय महाकाली ।
आरती ओंवाळूं पंचारती ओंवाळूं वंदू पदभाळी ॥ धृ. ॥
जगतारिणी दु:खहारिणी कुळस्वामिणी माते ।
नाना विघ्ने वेष्ठुनी कष्टविती माते ॥
करुणा करिं शांकरि तूं अनाथजगनाथे ।
भवभय सर्वहि हरिसी हें तों तंव नातें ॥ जय. ॥ १ ॥
बौद्धरूप दैवत या कलिमाजी आले ।
न मिळें फल मानवांच्छित शंकित मन झाले ॥
तूं एक जागृत ऎकुनि मन माझें धाले ।
जड्लें दृढ मम मानस निश्चळ नाहालें ॥ जय. ॥ २ ॥
तव गुणप्रताप अद्‌भुत ऎकुनिया कानी ।
ध्यानीं मनि दिनरजति स्तविती निर्वाणी ॥
लज्जा राखी माते हे शुभकल्याणी ।
कृपाकटाक्षें लक्षी रक्षी तव चरणी ॥ जय. ॥ ३ ॥
निर्जर मुनिवर सर्वही तुजलागी ध्याती ।
केली त्यां कैवारें दैत्यावर ख्याती ॥
मर्दुनि शूंभनिशूंभा महिषासुर जाती ।
सप्तशतीचा महिमा मृकडुसुत गाती ॥ जय. ॥ ४ ॥
जिवजंतुमनार्कितू जाणसि सर्वाचा ।
अनंतरसाक्ष तूं हेतू कां न कळें अमुचा ॥
संचितक्रियमाणा जरि मानूं मुळसंचा ।
तरि मग काय परक्रम वदला मुनि त्याचा ॥ जय. ॥ ५ ॥
विज्ञप्ती श्रुत व्हावी सादर सुख शाली ।
बद्धांजुळी विनवीतों विनतीच्या चालीं ॥
सुंदरपदपंकजी रखमा मिठी घाली ।
षट्‌पदज्वत गुंजारव करितो भोंताली ॥ जय. ॥ ६ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel

Books related to देवी आरती संग्रह


 भवानी तलवारीचे रहस्य
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय
मानवजातीची कथा
भारताची महान'राज'रत्ने
जगातील अद्भूत रहस्ये
भगवान बुद्ध
शिव-परिवार प्रतिमेचे रहस्य
गोड शेवट
शनि की साढ़े साती
महाशिवरात्री
अगम्य (गूढ कथा)
शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha
शिवचरित्र
चिमणरावांचे चर्हाट
शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha